सोलापूरचे सांस्कृतिक वैभव

श्री हिराचंद नेमचंद वाचनालय

Main Building of Library
पुस्तकांची देवघेव पध्दत:


Book Return or Issue

      संगणकाची बारकोड पध्दत आहे - बारकोड स्कॅनर आहेत.
      संग्रहांक , पुस्तकाचे नाव , लेखकाचे नाव , अनुवादकाचे नाव , प्रकाशकाचे नाव , विषयाच्या वर्गवारीनुसार कपाट क्रमांकावरुन अशा सात प्रकारे पुस्तकांचा शोध घेता येतो.                                           

    पुस्तके खालील सात पध्दतीने शोधता येतात.
        १) पुस्तकांच्या दाखल क्रमांकावरुन
        २) पुस्तकाच्या नावावरुन
        ३) मूळ लेखकाच्या नावावरुन
        ४) अनुवादक अथवा संपादकाच्या नावावरुन
        ५) विषयाच्या वर्गवारीनुसार
        ६) प्रकाशकाच्या नावावरुन
        ७) कपाट क्रमांकावरुन

        संगणका व्यतिरीक्त वाचनालयात सभासदांच्या सोयीसाठी विषयानुसार, लेखाकानुसार व प्रत्येक कपाट क्रमांकानुसार याद्या पाहण्यास ठेवलेल्या आहेत.
        या याद्या वाचून सभासद कोणत्याही पुस्तकाची मागणी करु शकतात.

   देवघेवीचा क्रम :-
      १) सभासदाने ओळखकार्ड व पुस्तक सेवकाकडे देणे.
      २) सभासदाचे खाते उघडले जाते.
      ३) पुस्तक सभासदाच्या नावे वर्ग होते.
      ४) सभासदाने स्वाक्षरी वहीत स्वाक्षरी करुन पुस्तक व टोकन घेणे.
      ५) जाताना दारावरील सेवकास पुस्तक दाखवून टोकन परत करुन जाणे.
      ६) एक पुस्तक पंधरा दिवसांनी परत करावे लागते.

  संगणकातून मिळणारी माहिती :-
    १) पुस्तक वाचनालयात आहे की सभासदाकडे आहे हे समजते.
    २) पुस्तक सभासदाकडे असल्यास कोणाकडे व किती दिवसापासून आहे हे समजते.
    ३) पूर्वी दिलेले पुस्तक आल्याची नोंद.
    ४) पूर्वी दिलेले पुस्तक उशिरा आल्यास दंडाचा हिशेब.
    ५) तीन महिन्याहून अधिक दिवसांची थकबाकी - नवीन पुस्तक देण्यास नकार.
    ६) मान्यतेपेक्षा अधिक पुस्तके देण्यास नकार.( सर्वसाधारण सभासदास एक व आजीव सदस्यास एका वेळी दोन पुस्तके मिळतात.)

  संगणकातून मिळणा-या याद्या:-
    १) एखाद्या लेखकांची कोणती व किती पुस्तके आहेत याची यादी मिळते.
    २) १५ दिवसाहून जास्त काळ सभासदाकडे असलेल्या पुस्तकांची यादी मिळते.
    ३) कपाटवार यादी मिळते.
    ४) सभासदांची यादी
    ५) पुस्तक यादी
    ६) विलंब पुस्तकाची यादी
    ७) वर्गणीची यादी
    ८) पुस्तक दिल्याची यादी
    ९) पुस्तक परत केल्याची यादी
    १०) ग्रंथ नोंदणी यादी
    ११) सभासदांनी वाचलेल्या पुस्तकाची यादी