इवल्याशा रोपाचा वृक्ष होताना
● १८ फेब्रु.१८५३ ला ' नेटिव्ह जनरल लायब्ररी ' या नावाने म्युनसिपल शाळा नं.१ मध्ये सुरु.
● स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ' जिल्हा वाचन मंदिर ' असे नाव झाले. १९२७ त कै.वि.वा.मुळे यांच्या प्रयत्नाने नगरपालिकेतर्फे रेव्हेन्यू प्लॉट क्र.२५ ची ११६०४ चौ.फूट जागा नाममात्र भाड्याने मिळाली. शेठ कै.हिराचंद नेमचंद यांच्या १५०० रु देणगीमुळे १०५६ चौ. फुटाचे बांधकाम असलेली, शहराच्या मध्यवर्ती किल्ल्यासमोर वाचनालयाची स्वत:ची, हक्काची वास्तू उभी राहिली.
● १९५३ मध्ये नवयुग व्याखनमालेच्या आर्थिक सहाय्याने उत्तरेकडील बांधकामावर ६५० चौ. " फुटाचे नवयुग सभागृह " उभे राहिले.
● १९५७ मध्ये वाचनालयाच्या ' शताब्दिपूर्ती समारोह ' झाला.
● १९५७ मध्येच शेठ हिरांचद नेमचंद यांचे चिरंजीव श्री गुलाबचंद हिराचंद दोशी यांनी दिलेल्या रु २०००० देणगीमुळे ' श्री हिराचंद नेमचंद वाचनालय असे संस्थेचे नामांतर झाले.
● याच वेळी म्हणजे शताब्दिपूर्ती महोत्सवाच्या मुहूर्तावर किर्लोस्कर कुटुंबियांकडून मिळालेल्या १०००० रु च्या देणगीतून इमारतीच्या मध्यभागावर वा.का.किर्लोस्कर ' सभागृह बांधण्यात आले.
● १९५७ मध्ये सोलापुरातील टिळक स्मारक मंदिर समितीकडून मिळालेल्या रु २०००० देणगीतून शेजारील ८२६२ चौ.फूट जागा विकत घेऊन ६०/४० असे भव्य सभागृह - टिळक स्मारक मंदिर बांधण्यास सुरवात झाली. १९६३ मध्ये १ ऑगस्ट रोजी प्राचार्य के.पं.मंगळवेढेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. रस्त्याच्याबाजूस हुतांत्म्याच्या चार पुतळ्याकडे तोंड असलेला असा टिळकांचा अर्धपुतळाही संस्थेने बसविला आहे.
● त्यानंतर अध्यक्ष प्रा.श्रीराम पुजारी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली १९९२ पासून इमारतीच्या संपूर्ण नूतनीकरणास सुरवात झाली. भूमिपूजन पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाले. १९९४ ला ३२ दुकानासह भव्य वाचनालयाचे बांधकाम पूर्ण झाले. २५ जुलै १९९४ रोजी पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
● लगेचच नजीकच्या जागेत कलासंकुलाच्या बांधकामास सुरवात झाली. ना.सुशीलकुमार शिंदे व सर्व नागरिकांच्या हस्ते दि. १० ऑक्टोबर २००१ रोजी पायाभरणी झाली. ३० जाने. २००३ रोजी पं. प्रभुदेव सरदार ,ज्येष्ठ लावणीगायक ज्ञानोबा उत्पात यांच्यासह सोलापुरातील मान्यवर कलावंतांनी नांदी गाऊन या वास्तूचे उदघाटन केले. डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते स्थानिक कलावंतांचे सत्कार करण्यात आले.
● या सर्व देखण्या वास्तूच्या उभारणीत वाचनालयाचे उपाध्यक्ष हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शनचे माजी डायरेक्टर श्री. मन्मथ रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाचा फार मोलाचा वाटा होता. अध्यक्ष प्रा.श्रीराम पुजारी यांनी तर झुंझारवृत्तीने अनेक अडचणीतून मार्ग काढत निरपेक्षपणे आणि जिद्दीने हे कार्य पूर्ण पूर्णत्वास नेले. त्यांना या कार्यामुळे महाराष्ट्र - राज्याचे माजी ग्रंथालय व संचालक कै.कृ.द.ऊर्फ.बाबासाहेब पुराणिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला २००१ चा पुरस्कार मिळाला.
● दि. १६ मार्च २००५ रोजी प्रा. श्रीराम पुजारी यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दि २५ जुलै २००८ रोजी गान सरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते कलासंकुलास ' प्रा.श्रीराम पुजारी कलासंकुल ' असे नाव देण्यात आले.